Daund Chord Line : दौंड कॉर्डलाइनचे होणार दुहेरीकरण; २८ रेल्वेंचे क्रॉसिंग टळणार

दुहेरी लाइन झाल्यानंतर पुण्याहून मनमाडच्या दिशेने व मनमाडहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या २८ रेल्वे गाड्यांना क्रॉसिंगसाठी दौंडच्या कॉर्डलाइनजवळ थांबावे लागणार नाही.
Daund Chord Line
Daund Chord Linesakal
Updated on

पुणे - दौंड कॉर्डलाइनचे दुहेरीकरण होणार असून, दुहेरी लाइन झाल्यानंतर पुण्याहून मनमाडच्या दिशेने व मनमाडहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या २८ रेल्वे गाड्यांना क्रॉसिंगसाठी दौंडच्या कॉर्डलाइनजवळ थांबावे लागणार नाही. यामुळे रेल्वेगाड्यांच्या वेळेत किमान ३० मिनिटांची बचत होणार आहे.

अप आणि डाउन लाइन झाल्यानंतर दोन्ही मार्गिकांवरून रेल्वेगाड्या सुसाट धावतील. सोलापूर रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून हे काम केले जाणार आहे. डिसेंबर २०२४पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.

दौंड कॉर्डलाइन एकेरी असल्याने पुण्याहून मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांना क्रॉसिंगसाठी पाटसजवळ थांबावे लागते. तर मनमाडहुन येणाऱ्या रेल्वेगाड्यांना काष्टीजवळ थांबावे लागते. एकच मार्गिका असल्याने एखाद्या रेल्वेला तरी क्रॉसिंगसाठी थांबावे लागत आहे. याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसत आहे. रेल्वे प्रवाशांची सोय व्हावी, त्यांच्या वेळेत बचत होण्यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाने कॉर्डलाइनच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव दिला. त्याला मंजुरीदेखील मिळाली.

सोलापूर विभाग करणार काम

दौंड ते मनमाडदरम्यान सध्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. कॉर्डलाइनचे कामदेखील या प्रकल्पांतर्गत केले जाणार आहे. त्यासाठी वेगळ्या निधीची आवश्यकता भासणार नाही. डिसेंबर २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सोलापूर विभागाकडून हे काम केले जाणार आहे.

७५० मीटर लांबीचा नवा फलाट

दौंड कॉर्डलाइनवर सध्या एक फलाट आहे. याच फलाटावर अप आणि डाउन रेल्वेगाड्या थांबतात. दुसरी मार्गिका झाल्यावर दुसऱ्या बाजूलादेखील एक ७५० मीटर लांबीचा फलाट बांधण्यात येणार आहे. त्यामुळे अप व डाउन गाड्यांसाठी स्वतंत्र फलाट असणार आहे. दोन फलाट झाल्यानंतर प्रवाशांच्या दृष्टीनेदेखील ते सोयीचे होणार आहे.

दौंड कॉर्डलाइन ते काष्टी ब्लॉक सेक्शन आहे. त्यामुळे येथून एकावेळी एकच रेल्वे धावते. कॉर्डलाइनचे दुहेरीकरण झाल्यानंतर या सेक्शनमधून धावणाऱ्या २८ रेल्वेंचे क्रॉसिंग टळणार आहे. याचा फायदा प्रवाशांना होईल. शिवाय उशिराने धावणाऱ्या गाड्यांच्या वेळेतदेखील बचत होण्यास मदत मिळेल.

- डॉ. रामदास भिसे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक, पुणे.

७० हजार प्रवाशांचा वेळ वाचणार

  • सामान्यपणे एका रेल्वेतून सरासरी २५०० प्रवासी करतात प्रवास

  • दौंड कॉर्डलाइनवर आणखी एक मार्गिका आल्याने रेल्वेला क्रॉसिंग होणार

  • अप आणि डाउन मिळून रोज या मार्गावरून २८ रेल्वे गाड्या धावतात. यातून सुमारे ७० हजार प्रवाशांची वाहतूक

  • डबल लाइनमुळे क्रॉसिंगला थांबावे लागणार नाही

  • एका गाडीला क्रॉसिंगला सुमारे ३० मिनिटे

  • पुण्याहून एखादी रेल्वे मनमाडच्या दिशेने निघाल्यावर पाटस स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबावे लागते

  • मनमाडहून पुण्याला येणाऱ्या रेल्वेला काष्टीजवळ थांबावे लागते

  • डबल लाइन झाल्यावर कोणत्याच रेल्वेला थांबावे लागणार नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com