पुणे - माहेरहून पाच लाख रुपये आणि सोन्याचे दागिने आणण्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून एका २० वर्षीय विवाहितेने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना केसनंद परिसरात घडली. वाघोली पोलिसांनी पतीला अटक केली असून, अन्य चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.