
पुणे : पुणे महापालिकेत २०१२ मध्ये समाविष्ट झालेल्या येवलेवाडी गावाचा विकास आराखडा (डीपी) तब्बल १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंजूर झाला आहे. त्यामुळे भविष्यात नियोजनबद्ध विकास होणार आहे. पण डीपी करण्यास झालेल्या विलंबामुळे परिसरात प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे झालेली आहेत. त्यांच्यावर कारवाई कशी करणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.