
पुणे : ‘‘महाराष्ट्राचा खरा इतिहास जनतेसमोर आणण्यात डॉ. आ. ह. साळुंखे आणि डॉ. जयसिंगराव पवार यांचे योगदान आहे. इतिहासाची मोडतोड करण्याची भूमिका काही तथाकथित विचारवंतांनी घेतली. मात्र वास्तव इतिहास या दोघांनी समोर आणला,’’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांनी केले.