डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन साजरा

डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन साजरा
Published on: 

डॉ. आंबेडकर शाळा प्रवेश दिन उत्साहात

सातारा, ता. ८ : भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने बार्टी आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा, सामाजिक न्याय विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतापसिंह हायस्कूल येथे विद्यार्थी दिवस आयोजित करण्‍यात आला होता.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्‍यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम, बार्टीचे संचालक बबन जोगदंड, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य व इतर मान्‍यवर उपस्‍थित होते.
डॉ. प्रिया शिंदे यावेळी म्हणाल्या, ‘‘प्रतापसिंह हायस्कूल येथील ग्रंथालयात अनेक दुर्मिळ पुस्तके असून, त्याचे डिजिटायझेशन करून ती जतन करण्यात येतील. शाळेच्या संवर्धनासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.’’ या शाळेत डॉ. आंबेडकर यांच्‍यासह अनेक महान लोकांनी शिक्षण घेतले आहे. त्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेत शाळेसोबतच साताऱ्याचे नाव उंचावण्‍याचे आवाहन केले.
राजू भोसले यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा निधी आणण्यासाठी प्रयत्नशील असल्‍याचे सांगितले. यानंतर तेजस्‍विनी कदम यांनी मनोगत नोंदवले. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू ज्ञानेश्वर म्हस्के, ज्‍येष्‍ठ लेखक डॉ. डी. टी. गायकवाड यांचे याठिकाणी व्याख्यान झाले. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
.........
64971
सातारा : वक्‍तृत्‍व स्‍पर्धेतील विजेत्यांचा सन्‍मान करताना डॉ. प्रिया शिंदे. समवेत राजू भोसले व इतर मान्‍यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.