
पुणे : ‘‘सुमारे दोन ते सहा लाख वर्षांपूर्वीच्या मानवाच्या अस्तित्वाचा शोध नर्मदा खोऱ्यात अलीकडच्या काळात लागला. हा मानवी उत्क्रांतीच्या संशोधनातील महत्त्वाचा पुरावा डॉ. अरुण सोनाकिया यांच्या अथक प्रयत्नांमुळे मिळाला,’’ असे गौरवोद्गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानववंशशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सुभाष वाळिंबे यांनी काढले.