
पुणे : लोकशाही वाचविण्यासाठी पुन्हा एकदा लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न अनुत्तरीत ठेवून निवडणुका धर्म व जातीवर नेल्या जात आहेत. त्यात देश-परदेशातील उद्योगपतींचा हस्तक्षेप होत आहे. सरकारच्या विरोधात बोलल्यास राष्ट्रदोह ठरतो. विरोधकांची मुस्कटदाबी सुरू आहे.