dr. baba adhav
sakal
पुणे - अवघी हयात रस्त्यांवरील मोर्चे, आंदोलनांमध्ये गेलेल्या डॉ. बाबा आढाव यांनी अखेरच्या श्वासापर्यंत आंदोलनांमधील सहभाग, कष्टकऱ्यांसाठीचा संघर्ष सुरूच ठेवला. १७ नोव्हेंबर रोजीच्या महापालिकेसमोर पथारी व्यावसायिकांच्या आंदोलनातही आपल्या खणखणीत आवाजात मार्गदर्शनही केले.