
मार्केट यार्ड : ‘माथाडी कायद्याच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी. याबाबत मुख्यमंत्री, कामगार मंत्र्यांसह बैठक घ्यावी. मात्र सरकारने कायदा बदलण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करू,’ असा इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला.