डॉ. बबन जोगदंड यांना पर्यावरणमित्र पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : डॉ. बबन जोगदंड यांना पर्यावरणमित्र पुरस्कार

पुणे : यशदा पुणे येथील माध्यम व प्रकाशन केंद्राचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या शैक्षणिक व पर्यावरणविषयक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण व पर्यावरणमित्र पुरस्कार देऊन राजभवनामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले.

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाच्या औचित्याने राजभवन मुंबईत झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे प्रमुख व समाजसेवक चंद्रकांत शहासने यांनी लिहिलेल्या ‘पर्यावरण विचार’ या पुस्तिकेचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते झाले. याच कार्यक्रमात शिक्षण व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील काही जणांना राष्ट्रीय पर्यावरणमित्र पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यामध्ये डॉ. जोगदंड यांचा समावेश होता. डॉ. जोगदंड यांनी शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय, पर्यावरणविषयक क्षेत्रात भरीव काम केले आहे. या कामाची दखल घेऊन त्यांना ‘राष्ट्रीय पर्यावरण व शिक्षण मित्र पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. डॉ. जोगदंड यांनी आतापर्यंत १५ विषयात पदव्या संपादन केल्या असून जवळपास आठ विषयांमध्ये प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. यशदाच्या ‘यशमंथन’ या मासिकाचे ते संपादक आहे

Web Title: Dr Baban Jogdand Give To Envoirnment Award

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..