Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पीएमपी मार्गात बदल

१३ एप्रिल रोजी पुणे स्टेशन परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी रात्री १० ते पहाटे पाच वाजेपर्यंत स्वारगेट ते पुणे स्टेशनदरम्यान पीएमपीएमएलची बस सुविधा रात्रभर सुरू
Dr Babasaheb Ambedkar Jayanti change in PMPML route pune transport traffic police
Dr Babasaheb Ambedkar Jayanti change in PMPML route pune transport traffic police sakal
Updated on

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी पुणे नगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) काही मार्गांवर बदल करण्यात येणार आहेत. तसेच, १३ एप्रिल रोजी पुणे स्टेशन परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी रात्री १० ते पहाटे पाच वाजेपर्यंत स्वारगेट ते पुणे स्टेशनदरम्यान पीएमपीएमएलची बस सुविधा रात्रभर सुरू ठेवण्यात येणार आहे.

Dr Babasaheb Ambedkar Jayanti change in PMPML route pune transport traffic police
Dr Babasaheb Ambedkar : 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ फुटाच्या पुतळ्याचे अनावरण

पुणे, पिंपरी चिंचवड आणि उपनगरांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तसेच, पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी नागरिकांची गर्दी होते.

या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थानक, ससून रोड आणि मोलेदिना बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेस पुणे स्टेशन आगारातून सुटतील. तसेच, परतीच्या वेळी बंडगार्डन येथून येताना वाडिया कॉलेज, अलंकार चौक ते पुणे स्टेशन आगारदरम्यान बससेवा सुरू राहील. नागरिकांनी या बस सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालकांनी केले आहे.

Dr Babasaheb Ambedkar Jayanti change in PMPML route pune transport traffic police
Dr. Ambedkar Jayanti : शहरातील वाहतूक मार्गामध्ये बदल; मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com