पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपला धक्का; लढणार अन् जिंकणार सुद्धा - डाॅ.रोंगे यांचा दावा

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपला धक्का;  लढणार अन् जिंकणार सुद्धा - डाॅ.रोंगे यांचा दावा
Published on: 

UPR26B08800
पुणे : शिक्षक मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना डाॅ. बी. पी. रोंगे. यावेळी उपस्थित मान्यवर.

डॉ. बी. पी. रोंगे यांनी
फडकावले बंडाचे निशाण

पुणे शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ५ : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने कौस्तुभ गावडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर पंढरपूरच्या स्वेरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. सोमवारी (ता. ५) डॉ. रोंगे यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
डॉ. रोंगे सोमवारी सकाळी सहा वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीचे आणि संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन पुण्याकडे रवाना झाले. यावेळी पंढरपुरात त्यांच्या शेकडो शिक्षक समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. डॉ. रोंगे मागील दोन-तीन वर्षांपासून पुणे शिक्षक मतदारसंघात निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यांनी मतदारसंघातील ५८ तालुके आणि शाळा पिंजून काढल्या आहेत. स्वेरीच्या माध्यमातून त्यांनी हजारो शिक्षकांचे प्रश्न सोडवले आहेत. टीईटी, जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शाळांचे प्रश्न आणि पदोन्नतीबाबत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे त्यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, ऐनवेळी पक्षाने कौस्तुभ गावडे यांना संधी दिल्याने रोंगे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.

कोट...
शिक्षकांचे प्रश्न सोडवल्यामुळे शिक्षकांचा मला मोठा पाठिंबा आहे. कदाचित माझे काम पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यात मी कमी पडलो असेल. परंतु, पक्षाने मला नाकारले असे म्हणता येणार नाही. पक्षाचा मी आदरच करतो. पण आता शिक्षकांनीच मला लढायला लावले आहे. आज मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. आता फक्त लढायचे नाही, तर जिंकायचेही, हा माझा निर्धार आहे.
- डॉ. बी. पी. रोंगे, अपक्ष उमेदवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com