
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिष्ठाता पदावर तात्पुरत्या स्वरूपात नेमणुका केलेल्या प्राध्यापकांचे तात्पुरत्या नेमणुकीचे निकष आणि आरक्षण धोरण, शिक्षकांची कॅसअंतर्गत होणारी पदोन्नती, मुख्य वसतिगृह प्रमुखपदाचा कार्यभार यासंदर्भात अधिसभा बैठकीसाठी सदस्य डॉ. हर्ष जगझाप यांनी विचारलेले प्रश्न विद्यापीठ प्रशासनाने अग्राह्य धरले. त्यामुळे, प्रश्न नाकारून अधिसभेच्या केलेल्या हक्कभंगाबाबत डॉ. जगझाप यांनी थेट विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनाच पत्र लिहिले आहे.