

Seven-Year Delay in Hospital Construction
Sakal
शिवाजीनगर : वडारवाडी येथील महापालिकेच्या डॉ. होमी जे. भाभा रुग्णालयाच्या चार मजली इमारतीचे काम सात वर्षांनंतरही पूर्ण झालेले नाही. अनेक महत्त्वाची कामे अद्याप प्रलंबित असल्याने रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. रुग्णालयाच्या आवारात ठेकेदाराचे कर्मचारी अनेक वर्षांपासून वास्तव्यास असून त्यांची वाहनेही याच ठिकाणी उभी केली जात आहेत. ठेकेदाराचे कर्मचारी आणि वाहनतळाची सोय रुग्णालयाच्या परिसरातच असल्यामुळे काम जाणीवपूर्वक संथ गतीने सुरू असल्याची शंका आता रुग्णांमध्ये निर्माण झाली आहे.