कर्मवीरांच्या जन्मभूमीत रक्तदानास प्रतिसाद

कर्मवीरांच्या जन्मभूमीत रक्तदानास प्रतिसाद

Published on

कर्मवीरांच्या जन्मभूमीत रक्तदानास प्रतिसाद

बार्शी शहर : कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांतर्गत चारे येथील कर्मवीर विद्यालयात रविवारी (ता. १) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात १२३ रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले. या शिबिराला चारे, वालवड, पाथरी, बोरगाव, बांगरवाडी, म्हसोबावाडी, परिसरातील नागरिक, माजी विद्यार्थी, पालक, महिला, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बार्शीतील भगवंत रक्तपेढीने सहकार्य केले. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचतात. रक्तदान ही मानवतेची खरी सेवा असून समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य हनुमंत चव्हाण यांनी केले. कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या विचारांना कृतीतून अभिवादन करण्याचा हा उपक्रम असल्याचे मत प्राचार्य चव्हाण यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com