कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉ. लाटणे तीन महिन्यांपासून गेले नाहीत घरी

Corona-Warriors_Pune
Corona-Warriors_Pune

हडपसर : आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार तसेच रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांना विश्रांतीची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र, पुणे शहरात सर्व विसरून कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेत डॉक्टरांची मोठी टीम अहोरात्र कार्यरत आहे. या संकटकाळात फ्रंट लाइनवर काम करणारे कोरोना वॉरियअर्स (डॅाक्टर्स) दिवसरात्र मेहनत करत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे येवलेवाडी येथील कोव्हिड केअर (सीसीसी) सेंटरमधील कोरोना रूग्णावंर उपचार करणारे महापालिकेचे डॉ. किरण लाटणे. ते गेल्या तीन महिन्यांपासून घरी गेले नाहीत. तसेच त्यांनी ३ महिन्यात एकदाही सुटी घेतली नाही.

डॉ. लाटणे म्हणाले, "कोरोनाच्या संकटात मी एकही दिवस सुट्टी न घेता रुग्णांवर उपचार करत आहे. मला माहित आहे की सध्या रुग्णांना माझी सगळ्यात जास्त गरज आहे. म्हणूनच मी माझं काम करतो. अनेक डॅाक्टरांना व कर्मचा-यांना व त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबापासून दूर राहणे आवश्यक असल्याने, मी गेल्या तीन महिन्यांपासून एकदाही घरी गेलो नाही. मी कोंढव्यातील एका हॅाटेलमध्ये रूम घेतली आहे, तेथेच राहत आहे. घरच्यांची खूप आठवण येते. मात्र, त्यापेक्षा माझे कर्तव्य पार पाडणे महत्वाचे आहे. कोरोनाची प्रकरणं कमी करण्यासाठी डॉक्टरांनी प्रथम स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणं आवश्यक आहे. जर फ्रन्टलाईनवर उभे असलेले डॉक्टरचं आजारी पडले तर आरोग्याच्या सुविधाही डळमळीत होतील.'

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्ण बरा झाला याचा कुटुंबियांइतकाच आनंद आम्हाला होतो. कारण चौदा दिवस रुग्ण पूर्णपणे आमच्या सहवासात असतो. त्याला शारीरिक, मानसिक आधार देताना आमच्याही नकळत आम्ही त्याच्याशी भावनिकदृष्ट्या जोडले जातो. त्यातून तो बरा होऊन घरी जाताना निश्चितच आम्हा सगळ्यांना आनंद होणे स्वाभाविक आहेच, पण जेव्हा रुग्ण, त्याचे नातेवाईक घरी जाताना आम्हाला डॉक्टर तुमच्या रुपाने देव भेटला, तुम्ही आता आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहात, आमच्या प्रयत्नांची, धावपळीची दखल घेत आपलेपणा व्यक्त करतो, तो क्षण खरोखर खूप समाधानाचा आणि ऊर्जा देणारा असल्याचे डॅा. लाटणे सांगतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना संसर्गाची भीती तुम्हा-आम्हा सगळ्यांनाच वाटते आहे. आम्ही तर थेट पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासात 24 तास ड्युटी करतो, त्यामुळे आम्हाला आणि आमच्या घरच्यांनाही भीती, काळजी ही आहेच, पण तरीही कोरोनाला हरवण्यासाठी आम्ही बाहेर पडलंच पाहिजे हे ही आमचे कुटुंबीय जाणून आहेत आणि त्यांच्या भावनिक पाठिंबा आणि समंजस सहकार्यामुळेच तर इतक्या चिंताजनक परिस्थितीतही आम्ही रूग्णांसोबत राहून रुग्णांना व्यवस्थितपणे योग्य उपचार देऊ शकत आहे. यामध्ये आमच्या कुटंबियांची भूमिका आणि सहकार्य विशेष असल्याचे डॅा. लाटणे यांनी नमूद केले.

(Edited By : Krupadan Awale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com