वडूज डॉ. कीर्तीराज जाधव यांना पुरस्कार बातमी

वडूज डॉ. कीर्तीराज जाधव यांना पुरस्कार बातमी
Published on

डॉ. कीर्तिराज जाधव सर्वोत्कृष्ट अधिकारी

उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरीबद्दल पुण्यात पुरस्कार

वडूज, ता. ९ : राज्य वस्तू व सेवा कर विभागातर्फे येथील डॉ. कीर्तिराज जाधव यांना उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जीएसटी दिनानिमित्त पुणे येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या महसूलवाढीसाठी दिलेले उल्लेखनीय योगदान, कर प्रशासनातील कार्यक्षमता, नावीन्यपूर्ण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी तसेच करदाताभिमुख सेवेतील कार्याची दखल घेत त्यांना पुरस्काराने गौरविले. डॉ. जाधव हे सलग दुसऱ्या वर्षी या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे मानकरी ठरले.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स ॲण्ड इकॉनॉमिक्स, माजी कुलगुरू डॉ. अजित रानडे यांच्या उपस्थितीत अतिरिक्त राज्य कर आयुक्त रेश्मा घाणेकर यांच्या हस्ते डॉ. जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त राज्य कर आयुक्त मंदार केळकर, सहआयुक्त नरेंद्र कासार, राजेंद्र कुऱ्हाडे, रंजन बाणखेले, वैशाली काशीद, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
डॉ. जाधव हे ज्येष्ठ नेत्या शशिकला जाधव- देशमुख यांचे सुपुत्र आहेत. ते वस्तू व सेवाकर राजपत्रित अधिकारी संघटनेचे राज्याचे सहसचिव म्हणूनही कार्यरत आहेत. मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

B00647
पुणे : डॉ. कीर्तिराज जाधव यांना पुरस्कार प्रदान करताना रेश्मा घाणेकर.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com