Dr. Parulekar Award : भागवत, पाटील, गोमासेंना डॉ. परुळेकर पुरस्कार

विविध विषयांवर आणि सामाजिक प्रश्‍नांवर सातत्याने लेखन करणाऱ्या ‘सकाळ’मधील बातमीदारांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते
Dr Nanasaheb Parulekar Award to sanjeev bhagvat mangesh gomase sadanand patil
Dr Nanasaheb Parulekar Award to sanjeev bhagvat mangesh gomase sadanand patil Sakal
Updated on

पुणे : मुंबई विद्यापीठातील उपकुलसचिव भरती प्रक्रियेतील गैरप्रकार समोर आणणारे बातमीदार संजीव भागवत, नागपूर मध्यवर्ती कारागृहातील गांजा आणि मोबाईल रॅकेटचा पर्दाफाश करणारे वरिष्ठ बातमीदार मंगेश गोमासे आणि कोल्हापुरातील राजाराम हायस्कूलच्या स्थलांतराबद्दल सडेतोड भूमिका घेणारे बातमीदार सदानंद पाटील यांना यंदाचा ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

विविध विषयांवर आणि सामाजिक प्रश्‍नांवर सातत्याने लेखन करणाऱ्या ‘सकाळ’मधील बातमीदारांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार (कै) ना. अ. पेंडसे यांनी दिलेल्या निधीतून पुरस्कार देण्यात येतो.

‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता. २०) सायंकाळी पाच वाजता बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कारांचे वितरण होईल. जल, जंगल, गिरीशिखरे या विषयावरील परिसंवादही होणार आहे.

भागवत यांनी ‘डेटा एन्ट्री ऑपरेटरचा थेट कुलसचिव’ हे वृत्त प्रकाशित केले होते. यासंबंधी उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांनी २० डिसेंबर २०२२ रोजी भरती प्रक्रियेच्या चौकशीचे आदेश दिले. माजी कुलगुरू आर. एस. गवळी यांच्या अध्यक्षतेखाली तीन तज्ज्ञांची समिती नेमली आहे.

गोमासे यांच्या वृत्तांकनामुळे नागपूर कारागृहातील गैरप्रकारासंबंधी अधिकाऱ्यांची उचलबांगडी झाली. कारागृहात कैद्यांकडे सातत्याने गांजा, मोबाईल, बॅटरी सापडत असल्याचे गोमासे यांनी उघडकीस आणले. याविषयी वृत्तमालिका प्रकाशित करत त्यांनी प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले.

Dr Nanasaheb Parulekar Award to sanjeev bhagvat mangesh gomase sadanand patil
Pune News : राजुरी गावात सामाजिक एकतेचे दर्शन,गणेश विर्सजनाच्या दुसऱ्या दिवशी ईदची मिरवणूक

पाटील यांच्या वृत्तामुळे ऐतिहासिक राजाराम हायस्कूलचे स्थलांतर थांबले, हायस्कूलचे स्थलांतर करून तेथे भक्तांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्यासंदर्भात चर्चा केली. अधिकाऱ्यांनी हे स्थलांतर होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ‘सकाळ’ म्हणून भूमिका घेत ऐतिहासिक हायस्कूलच्या स्थलांतराचा डाव हाणून पाडला. वृत्तमालिका आणि कोल्हापूरकरांच्या प्रतिसादामुळे पालकमंत्री दीपक केसकर यांनी स्थलांतर होणार नाही, अशी घोषणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com