Narendra Dabholkar : हत्या प्रकरण; घटनेच्या दिवशीच मुख्य साक्षीदाराचा जबाब नोंदवला

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली त्या दिवशीच या घटनेतील मुख्य साक्षीदार विनय केळकर याचा जबाब नोंदविण्यात आला.
Dr Narendra Dabholkars
Dr Narendra Dabholkarssakal

पुणे - महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली त्या दिवशीच या घटनेतील मुख्य साक्षीदार विनय केळकर याचा जबाब नोंदविण्यात आला. अशी साक्ष डेक्कन पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. एस. जोशी यांनी न्यायालयाला दिली. जोशी यांची साक्ष व उलट तपासणी शनिवारी विशेष न्यायालयात नोंदविण्यात आली.

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात ‘सनातन’ संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने जोशी यांची साक्ष केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) विशेष सरकारी वकील प्रकाश सुर्यवंशी यांनी नोंदवली.

20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी सहाय्यक पोलिस निरीक्षक साळुंके यांनी ओंकारेश्वर पुलावर एका व्यक्तीची गोळ्या घालून खून करण्यात आली असल्याची माहिती दिली. त्यावेळी मी चिंचवडला रहायला होतो. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी तत्काळी घटनास्थळी दाखल झालो. यादरम्यान, साळुंके यांनी घटनेबाबत एसीपी तसेच डेक्कने पोलिस ठाण्याच्या डीसीपी झोन यांना कळविले. त्यायांनी डीसीपी रानडे, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन सकुंडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) केंजळे यांसह अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी, जोशी विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रानगट यांकडे प्राथिमिक चौकशी केली.

त्यानंतर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) केंजळे यांना रानगट यांची फिर्याद घेण्यासाठी डेक्कनला जाण्यास सांगितले. त्यानंतर, जोशी यांनी दोन पंचाना बोलावून घटना स्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळावर पडेलल्या वस्तू जप्त केल्या. तर, साळुंके यांनी ससून रुग्णालयातून मिळालेल्या वस्तून जोशी यांकडे हजर केल्या. त्यानंतर, गुन्हेगाराचा शोध घेण्याचे काम सुरू ठेवले. त्यानंतर, दोन दिवसांनी म्हणजेच 22 ऑगस्ट 2013 रोजी गुन्हे शाखेकडे हे प्रकरण हस्तांतरीत करण्यात आले, अशी साक्ष जोशी यांनी नोंदविल्याचे विशेष सरकारी वकील सुर्यवंशी यांनी सांगितले.

जोशी यांची उलटतपासणी -

बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. प्रकाश साळशिंगीकर यांनी जोशी उलटतपासणी घेतली. यावेळी ज्या व्यक्तीने फिर्याद दिली त्या व्यक्तीला गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकला का? असा प्रश्न केला का असता जोशी यांनी नाही असे सांगितले. तसेच कोणी मारले, मारून कुठे पळाले, किती वाजता मारले असे प्रश्न फिर्यादिला विचारले का असा सवाल केला असता जोशी यांनी नाही सांगितल्याचे बचाव पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जानेवारी रोजी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com