Dr. Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोलकरांची बारा पुस्तके आता ब्रेल लिपीत

विवेकी विचार दृष्टिहीन व्यक्तींपर्यंत पोचावे यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे साहित्य लायन उषा येवले यांनी ब्रेल लिपीत आणले आहे.
Brail-Lipi
Brail-Lipisakal

पुणे - विवेकी विचार दृष्टिहीन व्यक्तींपर्यंत पोचावे यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे साहित्य लायन उषा येवले यांनी ब्रेल लिपीत आणले आहे. डॉ. दाभोलकर यांच्या १२ पुस्तकांचे १२ ब्रेल लिपीतील आवृत्तीचे प्रकाशन डॉ. हमीद दाभोलकर यांचे हस्ते आणि लायन मीनांजली मोहिते यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १७) आळंदी पुणे येथील एनबीएफएम या अंधशाळेत होणार आहे.

१० दृष्टिहीन व्यक्तींच्या संस्थांना १२ पुस्तकांचा संच यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुपूर्त करण्यात येईल. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तिका ब्रेल लिपीत उपलब्ध होत असल्याने दृष्टिहीन व्यक्तींपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद, चमत्कार सादरीकरण, स्त्रिया आणि अंधश्रद्धा, सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा, फलज्योतिष, श्रध्दा अंधश्रद्धा, उत्क्रांतीवाद, धर्मनिरपेक्षता असे विषय पोचतील. डॉ. दाभोलकर यांचे सर्व साहित्य यापूर्वी हिंदी भाषेत प्रसिद्ध झाले आहे.

लायन उषा येवले आणि अशोक येवले यांच्यासह जागृती अंधशाळेच्या ब्रेल छापखान्याचे गजानन मगर, अंनिसचे राहुल थोरात, मिलिंद देशमुख, जागृती अंधशाळेच्या मुख्याध्यापिका मंगला वानखेडे , एनबीएफएमचे उपाध्यक्ष सिद्धू बिराजदार यांच्या सहकार्याने ही पुरोगामी विचारांची पुस्तके ब्रेल लिपीत येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com