

Justice for Minor: Neelam Gorhe Demands Strict Action in Parvati Assault Case
esakal
पुणे : पर्वती परिसरात एका ६० वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या नऊ वर्षीय नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.