पुणे - ‘डीआरडीओ’चे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी हनी ट्रॅप प्रकरणात पाकिस्तानी हस्तक महिलेला देशाच्या सुरक्षेशी संबंधित माहिती पुरविल्याचा आरोप आहे. परंतु ही माहिती गोपनीय आहे की नाही, हे स्पष्ट नसल्याने शासकीय गुपिते कायदा लागू होणार नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. दरम्यान, या खटल्यातून दोषमुक्त करण्याबाबत डॉ. कुरुलकर यांनी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला आहे.