प्रकाश आमटेंची प्रकृती पुन्हा बिघडली; रुग्णालयात दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dr prakash amte

प्रकाश आमटेंची प्रकृती पुन्हा बिघडली; रुग्णालयात दाखल

प्रकाश आमटेंची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशी माहिती अनिकेत आमटे(dr prakash amte admitted to hospital ) यांनी दिली आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics LIVE: शेलारांसोबत बैठकीनंतर फडणवीस दिल्लीला रवाना

डॉ. प्रकाश आमटे यांना 27 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने सर्व व्हिजीटर्सना प्रवेश बंद केला आहे. तसेच, डॉक्टरांनी फोन करून तब्येत विचारू नये. वेळोवळी डॉक्टरांकडून अपडेट कळवले जातील. अशी सूचनादेखील दिली असल्याचे अनिकेत आमटे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रच नव्हे, तर उत्तर प्रदेशपासून दिल्लीपर्यंत देशातील 'ही' राजकीय घराणी संकटात

दिनेश मंगेशकर हॉस्पीटल पुणे येथे येऊन गेले असल्यास खाली रजिस्टर ठेवले आहे त्यावर आपण शुभेच्छा संदेश, नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहावा. पण, भेटीची अपेक्षा आणि आग्रह करू नये. असे अनिकेत आमटे यांनी म्हटलं आहे.

मागील आठवड्यात म्हणजेच १३ जूनदरम्यान, डॅा. आमटे हे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभासाठी पुण्यात आले असता त्यांना ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवला. म्हणून त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. न्युमोनिया बरा झाल्यानंतर आता कर्करोगावरील उपचारांसाठी त्यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Dr Prakash Amte Admitted To Hospital

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..