खटावचा मान उंचावला; डॉ. प्रिया शिंदे प्रदेश उपाध्यक्षा

खटावचा मान उंचावला; डॉ. प्रिया शिंदे प्रदेश उपाध्यक्षा

Published on

डॉ. प्रिया शिंदे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत केली निवडीची घोषणा

खटाव, ता. २५ : खटाव जिल्हा परिषद गटाच्या नवनिर्वाचित सदस्या डॉ. प्रिया शिंदे यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबई येथे ही निवड अधिकृतरीत्या घोषित केली.
डॉ. प्रिया शिंदे या अभ्यासू, समतोल व संयमी नेतृत्वासाठी ओळखल्या जातात. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले असून, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय योगदान राहिले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, युवकांना मार्गदर्शनासाठी तसेच गावागावातील विकासकामांसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
कामाची उरक, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि सर्वांना बरोबरीने घेऊन जाण्याची त्यांची भूमिका ही त्यांच्या नेतृत्वाची जमेची बाजू मानली जाते. तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला संवाद, कार्यतत्परता आणि पक्षनिष्ठा यामुळेच त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे पक्ष वर्तुळातून सांगण्यात येत आहे. या निवडीबद्दल खटाव तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात जलसिंचन, रस्ते व इतर शेतीला पूरक असणाऱ्या योजना यशस्वीपणे राबविण्यात आल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची संधी मिळत आहे. येत्या काळात पक्षाने दिलेल्या या पदाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. भाजप पक्षवाढीसाठी आणि समाजहिताच्या उपक्रमांसाठी अधिक जोमाने काम करणार असल्याचा विश्वास डॉ. प्रिया शिंदे यांनी व्यक्त केला.
--------------------------------
01350
मुंबई : डॉ. प्रिया शिंदे यांचे निवडीबद्दल अभिनंदन करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण.
----------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com