''नॅशनल मिशन फॉर मेंटरिंग''मध्ये डॉ. पाटील यांची निवड

''नॅशनल मिशन फॉर मेंटरिंग''मध्ये डॉ. पाटील यांची निवड

Published on

ओतूर : भारत सरकारच्या ''नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन'' आणि शिक्षण मंत्रालयाद्वारे राबविण्यात येत असलेल्या ''नॅशनल मिशन फॉर मेंटरिंग''मध्ये मार्गदर्शक म्हणून डॉ. राहुल प्रतापसिंग पाटील यांची निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ.वसंत गावडे यांनी दिली. ओतूर (ता.जुन्नर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात डॉ. राहुल पाटील कार्यरत आहेत. या निवडीमुळे डॉ. पाटील आता राष्ट्रीय स्तरावरील (एनएमएम) ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून देशभरातील शिक्षकांशी जोडले जातील. ते शिक्षकांना अध्यापन पद्धती, शैक्षणिक तंत्रज्ञान आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करतील. विशेष म्हणजे, ही मोहीम शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि शिक्षकांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com