डॉ. रामचंद्र देखणे यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Ramchandra Dekhne

संतसाहित्य आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे मंगळवारी अनंतात विलीन झाले.

डॉ. रामचंद्र देखणे यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

पुणे - संतसाहित्य आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे मंगळवारी (ता. २७) अनंतात विलीन झाले. देखणे यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार झाले.

डॉ. देखणे यांचे सोमवारी (ता. २६) हृदयविकाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव शनिवार पेठ येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी आठ ते दहा या वेळात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. देखणे यांचे पुत्र भावार्थ यांनी अग्नी दिला. या प्रसंगी देखणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी साहित्य, शिक्षण, अध्यात्म, राजकारण, समाजकारण आदी क्षेत्रांतील विविध मान्यवर उपस्थित होते.

यामध्ये गो. बं. देगलूरकर, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, डॉ. सदानंद मोरे, रामदास फुटाणे, कृष्णकुमार गोयल, सतीश देसाई, प्रा. मिलिंद जोशी, विजयराव कोलते, सु. वा. जोशी, राजीव बर्वे, संगीता बर्वे, प्रभाकर ओव्हाळ, सुरेश गरसोळे, पं. रघुनाथ खंडाळकर, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब काशीद, नंदकुमार लांडगे, पांडुरंग अप्पा दातार, पुरुषोत्तम महाराज पाटील, अवधूत गांधी, भागवत महाराज साळुंखे, अर्जुन भांडवलकर, सचिन पवार, विजय बोत्रे, रवींद्र माळवदकर, शाहीर हेमंतराजे मावळे आदी उपस्थित होते.

यावेळी संदीप नवले, नाथाभाऊ शेवाळे, प्रा. मिलिंद जोशी, हणुमंतराव गायकवाड, भाऊसाहेब भोईर, चंद्रकांत महाराज वांजळे आणि भानुदास महाराज तुपे यांनी देखणे यांना श्रद्धांजली अर्पण केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देखणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृह येथे रविवारी (ता. २) सायंकाळी पाच वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :punefuneral