Speaking at Sakal Bhakti Shakti Vyaspeeth, Dr More highlighted the contribution of saints in shaping Maharashtra's social and cultural legacy.
Sakal
पुणे : ‘‘ देशात अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर धर्म, भाषा, संस्कृतीवर आक्रमण झाले. अशा परिस्थितीमध्येही महाराष्ट्रातल्या लोकांनी जी आपली भाषा, धर्म, संस्कृती टिकवून धरली. त्याचे कारण म्हणजे संतांनी उभे केलेल्या वारी, दिंडी या यंत्रणेमुळे. या माध्यमातून प्रबोधन होत असे. त्यामुळेच महाराष्ट्रातील लोक परकीय सत्तेच्या विरोधात बंड करून उठले व त्याचे श्रेय संत, वारीला जात असून त्याने महाराष्ट्राची अस्मिता टिकविली’’ असे विचार संतसाहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.