डॉ. संजीव डोळे यांना जीवन गौरव पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. संजीव मनोहर डोळे यांना महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, मुंबई या संस्थेतर्फे देण्यात आलेला डॉ. हॅनिमन जीवन गौरव पुरस्कार आरोग्य शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

पुणे - प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. संजीव मनोहर डोळे यांना महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, मुंबई या संस्थेतर्फे देण्यात आलेला डॉ. हॅनिमन जीवन गौरव पुरस्कार आरोग्य शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या होमिओपॅथिक डॉक्‍टरांना हा पुरस्कार मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात देण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉ. डोळे हे गेली 36 वर्षे पुणे येथे होमिओपॅथी तज्ज्ञ म्हणून व्यवसाय करीत आहेत. वैद्यकीय व्यवसायाबरोबरच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असून, दिव्यांगांसाठीचे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. औंध येथील बाल कल्याण संस्थेचे ते विश्‍वस्त आहेत. तसेच नारायणगाव (ता. जुन्नर) येथील डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे ते ट्रस्टी असून, या संस्थेतर्फे ग्रामीण भागातील लाखापेक्षा जास्त रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणात आल्या आहेत. भारती विद्यापीठ होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये होमिओपॅथी चिकित्सक म्हणून ते कार्यरत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Sanjeev Dole Lifetime Achievement Award