पुणे कँटोन्मेंटची जागा 'आरपीआय'ला द्यावी : डॉ. सिद्धार्थ धेंडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

पुणे : आमागी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) यांच्या युतीमध्ये पुणे शहराची एक जागा विशेषता, पुणे कँटोन्मेंटची जागा 'आरपीआय'ला मिळावी, अशी मागणी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

''मागील विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील भाजपच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी आरपीआयने भाजपला सहकार्य केले. तसचे महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी देखील आरपीआय भाजपच्या पाठीमागे उभी राहिली. या निवडणुकीत पक्षाने युतीमध्ये विधानसभेच्या 10 जागा मागितल्या आहेत. त्यात पुणे कँटोन्मेंट मतदारसंघ राखीव असल्याने या मतदारसंघाची आग्रही मागणी आम्ही युतीकडे केली आहे. या मतदारसंघात पक्षाची ताकद फार मोठी आहे. त्यामुळे येथे आमचा उमेदवार सहज निवडून येईल'', असे डॉ. धेंडे यांनी सांगितले. 

तसेच या जागेबाबत उद्या (गुरुवारी) केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे, असेही डॉ. धेंडे यांनी या वेळी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Siddhartha dhende demands Pune cantonment Place for RPI to BJP and Shiv Sena alliance