

डॉ. स्मिता जाधव यांना
दिलेली शाल विजयाची
खासदार उदयनराजे : साताऱ्यात प्रचार दौरा, थोर नेत्यांच्या पुतळ्यांना केले अभिवादन
सातारा, ता. १७ : निवडणूक काळात मला अनेक जण भेटायला येतात; पण कोणी काहीही सांगितले तरी अफवांवर विश्वास न ठेवता डॉ. स्मिता जाधव यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या. त्यांना मी दिलेली शाल विजयाची आहे. त्यामुळे मतदारांनी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना साथ द्यावी, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी आज साताऱ्यात प्रचार दौरा केला. त्यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांनाही अभिवादन करून प्रचार दौरा सुरू केला. त्यानंतर त्यांनी जलमंदिर पॅलेस येथे जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी महायुती समन्वयक सुनील काटकर, प्रतापगड विकास प्राधिकरण समिती सदस्य काका धुमाळ, विकास गोसावी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने-कदम व पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर डॉ. स्मिता जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील व मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मंत्री मकरंद पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अनिल देसाई, चित्रलेखा माने- कदम व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, साताऱ्यात डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारार्थ सातारा व कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघांतील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे, अजित साळुंखे, मदन काळभोर, सागर शिवदास, रणजित जाधव, सुषमा जाधव, अनिता वेताळ, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, निशांत गवळी, अमित कुलकर्णी, श्रीरंग काटेकर उपस्थित होते.
...............................
PNE26W59713
सातारा : डॉ. स्मिता जाधव यांचा सत्कार करताना उदयनराजे भोसले, त्यावेळी सुनील काटकर, तेजस्विनी घोरपडे, चित्रलेखा माने कदम, वैशाली भिलारे, शांताताई कोळी, सुजाता राजेमहाडिक, आदी.
...........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.