
डॉ. स्मिता झांजुर्णे झाल्या फुल आयर्नमॅन
हडपसर - जगातील अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या साऊथ आफ्रिकेतील फुल आयर्नमॅन स्पर्धेत हडपसर येथील महिला डॉक्टरने यश मिळविले आहे. डॉ. स्मिता झांजुर्णे यांनी ही स्पर्धा विहित वेळेत पूर्ण करून आयर्न मॅन हा किताब मिळवला आहे. समुद्रातून चार किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर धावने असे या स्पर्धेचे स्वरूप होते. मात्र समुद्री वादळामुळे संयोजकांकडून पोहण्याची स्पर्धा रद्द करण्यात आली होती. मात्र, १८० किलोमीटरचा घाटातील रस्ता, सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस हे सायकलिंगमधील आव्हान पेलत डॉ. झांजुर्णे यांनी ही स्पर्धा पूर्ण केली. संपूर्ण स्पर्धा सलग निर्धारित वेळेत यशस्वीपणे पूर्ण करून त्यांनी हा आयर्न मॅन किताब मिळवला. यावेळी भारतीय तिरंगा हातात फडकावत त्यांनी आंनद व्यकत केला.
हडपसर परिसरातील त्या पहिल्या महिला आयर्नमॅन (आयर्नलेडी) ठरल्या आहेत. त्यांचे पती डॉ. राहुल झांजुर्णे यांनीही यापूर्वी जर्मनी येथील जागतिक स्पर्धेत आयर्नमॅन किताब पटकावला आहे. स्पर्धेसाठी डॉ. राहुल यांच्यासह पॉवरपिक्स या संस्थेचे चैतन्य वेल्हाळ यांचे मार्गदर्शन डॉ. स्मिता यांना मिळाले.
"दुबईत हाफ आयर्नमॅन आणि जर्मनीत स्पर्धेत झालेल्या अपघातामुळे फुल आयर्नमॅनचे स्वप्न अपुरे राहिले होते. त्यानंतर दररोज अडीच तासाच्या सरावाने साऊथ आफ्रिकेतील स्पर्धेत यशस्वी होता आले. पती डॉ. राहुल झांजुर्णे व चैतन्य वेल्हाळ यांचे मार्गदर्शन त्यासाठी महत्वपूर्ण ठरले. माझ्या या यशाने असा किताब मिळवणारे आम्ही भारतातील पहिले डॉक्टर दांपत्य ठरलो आहोत.'
डॉ. स्मिता झांजुर्णे, आयर्नमॅन किताब विजेत्या
Web Title: Dr Smita Jhanjurne Became Full Ironman
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..