मलकापूर कृष्णा’च्या डॉ. टी. पूविष्णु देवी यांची आंतरराष्ट्रीय प्राध्यापकपदी नियुक्ती फिजिओथेरपी क्षेत्रातील
‘कृष्णा’च्या डॉ. टी. पुविष्णू देवींची
आंतरराष्ट्रीय प्राध्यापकपदी नियुक्ती
मलकापूर, ता. २६ : मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथील ‘ग्लोबल नेटवर्क ऑफ बायोइथिक्स, मेडिकल ॲण्ड प्रोफेशन्स एज्युकेशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने कृष्णा विश्व विद्यापीठातील फिजिओथेरपी विभागाच्या अधिष्ठाता डॉ. टी. पुविष्णू देवी यांची अलाईड हेल्थ सायन्सेस व फिजिओथेरपी विद्याशाखेच्या ‘आंतरराष्ट्रीय प्राध्यापक’पदी नियुक्ती केली.
त्याबद्दल कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. तमिळनाडूतील एसआरएम विद्यापीठात ‘ग्लोबल नेटवर्क ऑफ बायोइथिक्स, मेडिकल ॲण्ड प्रोफेशन्स एज्युकेशन’ संस्थेच्या नुकत्याच झालेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय बैठकीत ‘ग्लोबल नेटवर्क’चे अध्यक्ष डॉ. प्रा. रसेल डिसूझा यांच्या हस्ते व सरचिटणीस डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत कृष्णा विद्यापीठाच्या डॉ. पुविष्णू देवी यांना नियुक्तिपत्र प्रदान केले. या वेळी कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा यांनी कार्यालयीन प्रत स्वीकारली.
ही नियुक्ती अलाईड हेल्थ सायन्सेस आणि फिजिओथेरपी क्षेत्रातील भारतातून पहिलीच इंटरनॅशनल फॅकल्टी नियुक्ती ठरली आहे. त्यामुळे कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्याचे अधोरेखित झाले. या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणि संशोधनपर परंपरेला नव्या उंचीची जोड मिळाली आहे.
या यशाबद्दल कुलपती डॉ. भोसले यांनी डॉ. देवी यांचा सत्कार केला. या वेळी कुलपतींचे सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. प्रवीण शिंगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, डॉ. हरी वासुदेवन आदी उपस्थित होते.
...
A01343
मलकापूर : डॉ. टी. पुविष्णू देवी यांचा सत्कार करताना डॉ. सुरेश भोसले.
.................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

