डॉ. विजय देव यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

राज्यशास्त्राचे विद्यार्थिप्रिय प्राध्यापक आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. विजय देव (वय ७८) यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने बुधवारी मध्यरात्रीनंतर निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी लेखिका डॉ. वीणा देव, दोन मुली, जावई आणि नातू असा परिवार आहे.

पुणे - राज्यशास्त्राचे विद्यार्थिप्रिय प्राध्यापक आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. विजय देव (वय ७८) यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने बुधवारी मध्यरात्रीनंतर निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी लेखिका डॉ. वीणा देव, दोन मुली, जावई आणि नातू असा परिवार आहे. दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचे ते जावई आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे ते वडील होत. डॉ. विजय देव यांच्या अंतिम इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

विद्यार्थिप्रिय प्राध्यापक अशी डॉ. विजय देव यांची ओळख होती. सर परशुरामभाऊ महाविद्यालयात त्यांनी प्राचार्य पदाची धुरा सांभाळली होती. महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

Web Title: Dr Vijay Dev Death