esakal | पाचव्या पिढीतील हायब्रीड वॉरफेअर म्हणजे नेमकं काय?
sakal

बोलून बातमी शोधा

पाचव्या पिढीतील हायब्रीड वॉरफेअर म्हणजे नेमकं काय?

पाचव्या पिढीतील आधुनिक युद्धशास्त्र असून ते पारंपरिक युद्धनीतीच्या विपरीत कार्य करते. यासाठी कोणत्याही देशाच्या आर्थिक,सामाजिक, धार्मिक,राजकारण सारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत माहिती गोळा करणे.

पाचव्या पिढीतील हायब्रीड वॉरफेअर म्हणजे नेमकं काय?

sakal_logo
By
डॉ. विजय खरे

पारंपरिक युद्धनीतीला छेद देत चीन आता भारताविरुद्ध संकरित युद्धनीतीच्या (हायब्रीड वॉरफेअर) वापरावर भर देत आहे. ‘हायब्रीड वॉरफेअर’ ही नवीन युद्धनीती आहे. पाचव्या पिढीतील आधुनिक युद्धशास्त्र असून ते पारंपरिक युद्धनीतीच्या विपरीत कार्य करते. यासाठी कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकारण सारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत माहिती गोळा करणे. तसेच या माहितीच्या आधारावर त्या देशाला जागतिक पातळीवर कमकुवत दर्शविणे हे ‘हायब्रीड वॉरफेअर’चे प्रमुख उद्दिष्ट असते. 

हायब्रीड वॉरफेअरचे तीन स्तंभ 
शत्रूराष्ट्रातील माहिती गोळा करताना काही निश्‍चित विषय ठरविले जातात. त्यातील भेदाच्या किंवा उणिवा शोधून अराजकता माजवली जाते. संबंधित विषयांच्या आधारावर त्या देशात अस्थिरता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्याचा प्रयत्न केला जातो. 
1 राजकारण
2 सामाजिक
3आर्थिक

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हल्ल्याची पद्धती
     शिक्षण, रोजगार, राजकारण, धर्म-जाती अशा विविध गोष्टींची माहिती घेणे
     समाज माध्यमांतून अफवा पसरवणे 
     युवकांना जाती-धर्म, राजकारण अशा विविध गोष्टींवर भडकवणे, त्यामुळे देशातील अशांतता निर्माण होते
     सायबर हल्ले करून माहितीचे संकलन करत त्याचा वापर

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारताने अशी घ्यावी काळजी 
     समाज माध्यमांवरील माहितीबाबतची धोरणे निश्‍चित करणे 
     बेरोजगारी, शिक्षण, आर्थिक विषमता आदी मुद्यांकडे सरकारने योग्य लक्ष द्यावे 
     केवळ लष्करी सक्षमता वाढवणे हा पर्याय नाही 
     समाजात अराजकता माजवू शकणारे मुद्दे गंभीरपणे हाताळावेत
     सायबर सज्जता वाढवणे 
     संरक्षणविषयक माहिती गोपनीय राहील याबाबत अधिक जागरुक राहणे
     नागरिकांचे सामाजिक अधिकार टिकवणे

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

- डॉ. विजय खरे, (विभाग प्रमुख, संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)