
पुणे : नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या राज्य युवा धोरणाचा प्रारूप आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत नुकताच सादर करण्यात आला. शाळा, महाविद्यालये, सोशल मीडिया आणि सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींनाही धोरणात सहभागी करून त्यांच्या सूचना समाविष्ट करण्याचा आदेश फडणवीस यांनी या वेळी दिला.