
लोहगाव : येथील श्रीराम लोट्स सोसायटीत सांडपाणी वाहिनी तुंबल्याने सोसायटीच्या आवारात दूषित पाणी साचले आहे. त्यामुळे येथून ये-जा करणे अवघड झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वारंवार प्रयत्न करूनही महापालिका कर्मचाऱ्यांकडून ही समस्या सुटत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.