
पुणे - मॉन्सूनचे आगमन होऊन शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. नाल्यात, रस्त्यावर भरपूर पाणी वाहत आहे. असे असताना सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय, नगर रस्ता वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नाले सफाई व पावसाळी गटारांच्या स्वच्छतेची निविदा आली आहे. त्यामुळे आता या निविदा काढून काय उपयोग असा प्रश्न उपस्थित झाला आहे.