लोहगाव-वाघोली येथील ड्रेनेजचे मैला पाणी रस्त्यावर

Drainage water from Lohgaon Wagholi is flowing on the road, posing a threat to the health of the citizens.jpg
Drainage water from Lohgaon Wagholi is flowing on the road, posing a threat to the health of the citizens.jpg
Updated on

रामवाडी (पुणे) : लोहगाव-वाघोली येथील मुख्य रस्त्यावर दादाची वस्ती, कर्मभूमी समोर ड्रेनेजचे मैला पाणी गेल्या अनेक दिवसांपासून उघड्यावर वाहत असल्याने वारंवार तक्रार करून ही नगररोड क्षेत्रीय कार्यालयाकडून समस्या सोडवल्या जात नाही. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या समस्याची दखल प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी येथील रहिवासी करित आहे.
 
महापालिकेच्या हद्दीत लोहगाव व आजूबाजूचा परिसर समाविष्ट होऊन ही मूलभूत समस्याकडे अजून ही दुर्लक्ष केले जात आहे. प्रभाग क्रमांक तीन विमाननगर-सोमनाथनगर या प्रभागात लोहगावमधील दादाची वस्ती, संतनगर, गुरुद्वारा हा परिसर येतो. या भागात कायमच नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे दुर्लक्ष झाले आहे. परिसरातील ड्रेनेज वाहिन्या, पावसाळी वाहिन्या अशा अनेक मूलभूत समस्याने ग्रासलेला प्रभाग तीनमध्ये येणारा शेवटचे टोक असलेल्या लोहगाव भागाकडे पूर्णतः नगरसेवक व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. 

या ठिकाणी ड्रेनेज वाहिन्या तुंबल्या असून दुरुस्ती करणे आवश्यक आहे. उघड्यावर वाहणाऱ्या ड्रेनेज वाहिन्या बंदिस्त कराव्या, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त सुहास जगताप म्हणाले, सदर समस्याविषयी महापालिकेच्या मुख्य खात्याला कळवण्यात आले आहे. पाहणी करून लवकरच कामे पुर्ण केले जातील.  

नगरसेविका श्वेता गलांडे म्हणाल्या, ड्रेनेजमधून मैला पाणी उघड्यावर वाहत आहे, अशी तक्रार नागरिकाने माझ्याकडे केली आहे. दोन दिवसात त्यांच्या समस्या सोडवल्या जातील. 

स्थानिक रहिवासी विश्वास खांदवे म्हणाले, परिसरात पावसामुळे ड्रेनेज तुंबले गेले आहे. ड्रेनेजची साफसफाई वेळेवर केली जात नसल्याने घाण पाणी रस्त्यावर येते, यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com