कोंढवा - पिसोळी स्मशानभूमीजवळ कोंढवा-पिसोळी मुख्य रस्त्यावर अर्धवट सोडलेली ड्रेनेज लाईन सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. हे काम अर्धवट अवस्थेत असून पुढे न जोडल्याने पाणी थेट रस्त्यावर येत आहे. प्रशासनाकडून मात्र, निधीची तरतूद नसल्याचे कारण देत वेळ मारुन नेण्यात येत आहे.