आंबेगावात ड्रेनेजचे रस्त्यावर पाणी ; महापालिकेचे दुर्लक्ष

अव्वाच्या सव्वा कर वसुली मग मूलभूत सुविधाचं घोड आडल कुठं? नागरिकांचा सवाल
Drainage water on the road in Ambegaon
Drainage water on the road in Ambegaon

आंबेगाव - आंबेगावातील मुख्य रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळील ड्रेनेज लाइन अनेक दिवसांपासून चोकअप झाली असून दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहते आहे. परंतु,महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने याकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसते आहे. तर गावातून बाहेर पडण्याच्या मुख्य रस्त्यावरच ड्रेनेजचे सांडपाणी वाहत असल्याने नागरिकांना येताजाता याच सांडपाण्यातून वाट काढावी लागते आहे.याचा मनस्ताप वाहनधारकांसह विद्यार्थी आणि पदचारी नागरिकांना होतो आहे.

महापालिकेच्या मुख्य खात्याकडून आंबेगावातील छत्रपती शिवाजी चौक ते गायमुख स्मशानभूमी जवळील कमान दरम्यान तीनशे वीस मीटर अंतरातील सहाशे मिलीमीटर व्यासाची ड्रेनेज लाइन मंजूरी मिळालेली आहे. परंतु ही मंजूर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कामाला मंजुरी मिळाल्याने काम सुरु करण्यात आले नाही.त्यानंतर आता ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन वाहते आहे.वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर भरमसाठ कर आकारणी करणाऱ्या महापालिकेचे मूलभूत सुविधा पुरविताना घोडे अडते कुठे असा सवाल नागरिक करत आहेत.

मुख्य खात्याकडून नवीन लाइन टाकेपर्यंत जैसे थे?

मलनिस्सारण विभागाकडून नवीन ड्रेनेज लाइन टाकण्या पर्यंत ड्रेनेज ची जैसे थे स्थिती राहणार आहे का? तोपर्यंत क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असणाऱ्या ड्रेनेज देखभाल व दुरुस्ती विभागाने तरी तूर्तास काही सोय करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

आंबेगावकरांचा महापालिकेने अंत पाहू नये. आमच्याकडून कर आकरणी मोठ्या प्रमाणावर आणि वेळेत केली जाते. मात्र मूलभूत सुविधाही वेळेत देत नाही. पावसाळा सुरु झाला तेव्हापासून आंबेगावातील ड्रेनेज ओव्हरफ्लो झाले आहे. त्यातून दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहते आहे. महापालिकेने याची विल्हेवाट लावावी.

- राहुल बेलदरे पाटील, पोलीस पाटील आंबेगाव.

मुख्य खात्याकडून सहाशे मिलीमीटर व्यसाची ड्रेनेज लाईन आंबेगाव चौक ते गायमुख जवळील कमान दरम्यान टाकण्यात येणार आहे. पाऊस सुरु असल्याने सद्या काम करता येत नाही. क्षेत्रीय कार्यालयाकडुन तात्पुरते काम करतो आहोत.

- राजेश धुमाळ, शाखा अभियंता मलनिस्सारण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com