पालिकेच्या पथविभागाचे चाललेय काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drainage work completed in kirkatwadi msedcl High voltage conductor cable in open space pune

पालिकेच्या पथविभागाचे चाललेय काय?

किरकटवाडी : किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावरील करंजावणे वस्तीजवळील वारंवार फुटणारे चेंबरचे झाकण पालिकेच्या पथ विभागाने बदलून अखेर त्या ठिकाणी लोखंडी झाकण बसविले आहे मात्र हे काम करताना अत्यंत धोकादायक असलेली महावितरणची उच्चदाब वीजवाहक केबल उघडी करून ठेवली आहे. वर्दळीच्या व अरुंद रस्त्यावर पालिकेच्या पथविभागाकडून अशाप्रकारे हलगर्जीपणाने काम करण्यात आल्याने किरकटवाडीतील नागरिकांसह महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे.

दोन दिवसांपूर्वी चेंबर दुरुस्तीसाठी आलेल्या पालिकेच्या पथ विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सदर ठिकाणी असलेल्या उच्चदाब वीजवाहक केबलला धक्का लागला व संपूर्ण किरकटवाडी गावचा वीजपुरवठा खंडित झाला. तब्बल बारा तास खंडित असलेला वीजपुरवठा महावितरण कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात व भर पावसात काम करुन सुरळीत केला. दुरुस्त केलेली केबल महावितरण कर्मचाऱ्यांनी पुन्हा पुरली होती.

काल दि. 5 जुलै रोजी पुन्हा पालिकेच्या पथविभागाचे कर्मचारी आले व सदर चेंबरवर लोखंडी झाकण ठेवण्यासाठी महावितरणने पुरलेली केबल काढून बाजूला उघडी करून ठेवली. पथ विभागाने चेंबरची दुरुस्ती करताना पुन्हा केबल गाडून टाकने आवश्यक होते मात्र केबल तशीच उघड्यावर ठेवून देण्यात आली. पालिकेच्या अशा भोंगळ कारभारामुळे किरकटवाडीतील नागरिक व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

"एक जखम बरी करण्यासाठी पथ विभागाने दुसरी मोठी जखम करुन ठेवली आहे. यात एखाद्याचा जीव गेल्यास कोण जबाबदारी घेणार?"

महेश गायकवाड, नागरिक, किरकटवाडी.

"पहिल्या दिवशी काम करताना पथ विभागाकडून आलेला कर्मचारी थोडक्यात बचावला होता यावरुनच त्यांना ती केबल किती धोकादायक आहे हे कळायला हवे होते. जवळच शाळा आहे, शेकडो मुले व पालक ये-जा करत असतात. पथ विभागाने तातडीने केबल गाडून घ्यावी."

नरेंद्र हगवणे, आर्किटेक्ट, किरकटवाडी.

"पालिकेच्या ठेकेदारांचे कर्मचारी येऊन अशी अर्धवट कामे करुन जात आहेत. ही उच्चदाब वीजवाहक केबल असल्याने अशी उघड्यावर ठेवून जाणे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. संबंधीतांनी किमान महावितरणला कळवायला तरी हवे होते."

कल्याण गिरी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण.

Web Title: Drainage Work Completed In Kirkatwadi Msedcl High Voltage Conductor Cable In Open Space Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..