DRDO Scientist Case : पाकिस्तानी हेर महिलेला गोपनीय माहिती पुरविल्याचा डॉ. प्रदीप कुरुलकरवर आरोप; १२ जानेवारीला होणार सुनावणी!

Pradeep Kurulkar Spy Case : डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याविरोधात पाकिस्तानी हेर महिलेला गोपनीय माहिती दिल्याच्या आरोपांवरील दोषारोप निश्चितीची सुनावणी १२ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. शासकीय गुपिते अधिनियमांतर्गत त्यांना १४ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
Charges Against Scientist Pradeep Kurulkar

Charges Against Scientist Pradeep Kurulkar

sakal
Updated on

पुणे : पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाची गोपनीय माहिती पाठविल्याप्रकरणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुण्यातील संशोधन आणि विकास आस्थापना (आर ॲण्ड डीई) या प्रयोगशाळेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकरवरील दोषारोप निश्चितीची सुनावणी येत्या १२ जानेवारी २०२६ होणार आहे. सरकार पक्ष आणि बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर आरोप निश्चिती झाल्यावर या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com