esakal | वयाच्या सत्तरीतील आजी वेणुबाई ओव्हाळ यांच्या घरांचे स्वप्न तालुका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनीधींमुळे झाले पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

The dream of 70-year-old Venubai Oval's house in Dhanep village has come true due to the taluka administration and local people's representatives..jpg

वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणाच्या बाजूला असलेले धानेप गावात ७० वर्षीय दलित समाजातील आजी वेणुबाई एकट्याच राहतात.

वयाच्या सत्तरीतील आजी वेणुबाई ओव्हाळ यांच्या घरांचे स्वप्न तालुका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनीधींमुळे झाले पूर्ण

sakal_logo
By
मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे (पुणे) : प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते. परंतु पतीचे व एकुलत्या एक मुलाचे निधन झाले तर ते स्वप्न कसे साकार होणार. एका मुलीचे लग्न झाले यानंतर एकट्यासाठी रडतच जीवन जगत असताना पडलेल्या घरात राहिलेलं आयुष्य ढकलत असताना वयाच्या सत्तरीतील आजी वेणुबाई दामू ओव्हाळ यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले ते तालुका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनीधींमुळे व ख-या अर्थाने यंदाची दिवाळी साजरी झाली.

वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणाच्या बाजूला असलेले धानेप गावात ७० वर्षीय दलित समाजातील आजी वेणुबाई एकट्याच राहतात. घर चालवायची भ्रांत असताना पडलेल घर बांधायचे कसे? हा मनात कधीही विचार आला नव्हता. परंतु विविध कामांनिमित्त येथील स्थानिक जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे धानेप गावात आले असता या आजींची माहिती सरपंच अश्विनी भुरुक यांच्याकडून मिळाली. आजी दलित समाजातील असल्याने रमाई घरकुल योजनेमध्ये घर बसवू असे आश्वासन दिले. परंतु आजींचा ६० वर्षापूर्वीचा जातीच्या दाखल्यासाठी कोणताही पुरावा नसल्याने घरकुल मिळणे अशक्य झाले.

आजींची आर्थिक व घरांची पडझड झालेली परिस्थिती पाहून जिल्हा परिषदेमधून ५० हजार तर ग्रामपंचायतीमधून ५२ हजार रुपये मंजूर केले. परंतु घरासाठी काही रक्कम कमी पडत होती ती कोण करणार असा प्रश्न उभा राहिल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी वैयक्तिक २५ हजारांची मदत केल्याने यंदाची दिवाळी आजीबाईंनी नव्या घरात साजरी केली.

गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सरपंच अश्विनी भुरुक, उपसरपंच विकास भिकुले, ग्रामविकास अधिकारी जी.एस.उंडे, सागर मळेकर, शेखर चोर, मछिंन्द्र कुंभार, विद्या चोर, तानाजी भुरुक यांचे सहकार्य लाभले तर अमोल नलावडे यांच्या उपस्थितीत या नवीन घरात प्रवेश करण्यात आला.
 
जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे म्हणाले, वेल्हे तालुक्यातील दुर्गम भागात अनेक दलित समाजातील व्यक्तींकडे जातीचा दाखला नाही तर या दाखल्यासाठी लागणारे ६० वर्षांचा कोणताच पुरावा नसल्याने अनेक जण शासकिय योजनेपासून वंचित रहात आहे, यासाठी प्रयत्न करणार आहे.