
पुणे : पुणे ते दौंडदरम्यान धावणाऱ्या डेमूचे लोकल सेवेत रूपांतर करण्याचे स्वप्न पुन्हा लांबणीवर पडले आहे. कारण, रेल्वे बोर्डाने दौंडला उपनगरचा दर्जा देण्यास नकार दिला आहे. पुणे रेल्वे प्रशासनाने दौंड स्थानकाला उपनगरचा दर्जा द्यावा, यासाठी प्रस्ताव पाठविला. मात्र, रेल्वे बोर्डाने कोणतेही समाधानकारक उत्तर न देता प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे आता राज्य सरकारवरच मदार आहे.