
पिण्याचे पाणी उकळून प्या; महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे आवाहन
पुणे : खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने मातीमिश्रित पाणी वाहून येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस गढूळ पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाणी उकळून व गाळून द्यावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पाण्यासोबत माती वाहून येण्याचे प्रमाण जास्त असल्याने हे पाणी गढूळ आहे.
हेच पाणी जलवाहिनीतून महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात येत आहे. याठिकाणी पाणी शुद्ध करून नागरिकांना पुरविले जात आहे. पण तरीही नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन महापालिकेने केले आहे. दरम्यान, पाण्याची गढूळतेचे (टर्बिडीटी) १० पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. सध्या हे टर्बिडीटीचे प्रमाण ८ वरून १४ वर गेले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
Web Title: Drink Boiled Water Appeal Of Pune Municipal Water Supply Department
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..