
शिक्रापूर : चाकण-शिक्रापूर रस्त्यावर करंदी (ता. शिरूर) हद्दीतील भारत गॅस फाट्यावर आज पुन्हा एकदा एका मद्यधुंद कंटेनरचालकाने दोन चारचाकी व एका दुचाकीला चिरडून दुकानाला धडक दिली. या भीषण अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. कंटेनरचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.