esakal | धक्कादायक:पुणे-मुंबई प्रवासात उबर ड्रायव्हर झोपला; महिलेनेच चालवली कॅब
sakal

बोलून बातमी शोधा

driver sleeps while pune mumbai drive women driver cab

ड्रायव्हरला बाजुच्या सीटवर झोपवून त्या महिलेनं मुंबईपर्यंत स्वतः कार चालवली. सध्या सोशल मीडियावर तिच्या या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे.

धक्कादायक:पुणे-मुंबई प्रवासात उबर ड्रायव्हर झोपला; महिलेनेच चालवली कॅब

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : मेट्रो सिटीजमध्ये तुम्ही रात्री एखादी कॅब बुक केली तर, कधी कधी ड्रायव्हरच्या डोळ्यावर झोप असल्याचं तुम्हाला स्पष्ट दिसतं. जवळपास 14-16 तास ड्रायव्हिंग करणारे हे ड्रायव्हर डोळ्यांत झोप असूनही ड्रायव्हिंग करत असतात. पण, तुम्ही दुपारी एखादी कॅब बुक केली आणि ड्रायव्हर पेंगत असेल तर? होय असाच एक अनुभव पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या एका महिलेला आलाय. विशेष म्हणजे ड्रायव्हरला बाजुच्या सीटवर झोपवून त्या महिलेनं मुंबईपर्यंत स्वतः कार चालवली. सध्या सोशल मीडियावर तिच्या या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

काय घडले? 
या घटनेबाबत माहिती अशी की, टाईम्स नाऊ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार तेजस्विनी दिव्या नाईक ही तरुणी पुण्याहून मु्ंबईला आपल्या घरी परतणार होती. त्यासाठी तिनं दुपारी एक वाजता उबरच्या ऍपवरून कार बुक केली. ड्रायव्हर वेळेवर पोहोचला. सुरुवातीला तो ठीक वाटत होता. पण, काही वेळातच त्याची तब्येत नीट नसून तो सतत डोकं हालवून स्वतःलाच जागे करत असल्याचं तेजस्विनीच्या लक्षात आलं. त्यानंतर काही वेळातच तो पेंगू लागला आणि पाठिमागून येणाऱ्या कारला धडकतही होता. हायवेवर सुरू असलेल्या या प्रकारामुळं तेजस्विनी घाबरली होती. पण, तिनं कसं तरी करून, त्या ड्रायव्हरला जागं केलं आणि त्याला तातडीने गाडी बाजूला थांबवायला सांगितली. त्याने कशीबशी गाडी बाजूला थांबवली. त्याचवेळी तेजस्विनीने स्वतः गाडी चालवण्यासाठी त्याला तयार केलं.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

उबरकडे तक्रार
तेजस्विनीने मुंबईत सुखरूप पोहोचल्यानंतर ड्रायव्हला पैसे देण्यास नकार दिला. त्याचवेळी तिने ट्विटर, इन्स्टाग्रामवरून उबरशी संपर्क साधला आणि संबंधित ड्रायव्हरची तक्रार केली. कंपनीने तिच्या तक्रारीची दखल घेतली असली तरी, तिला कोणत्याही प्रकारची भरपाई दिलेली नाही. कंपनीच्या रिस्पॉन्स टीमने तिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून एफआयआर कॉपीसह भरपाईसाठी अर्ज करण्यास सांगितले आहे, अशी माहिती तेजस्विनीने दिल्याचे टाईम्स नाऊने म्हटले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ड्रायव्हर पेंगत असल्याचं लक्षात आल्यानंतर मी तातडीने गाडी बाजूला थांबवायला सांगितली. मला गाडी चालवण्यात काही अडचण नाही, मला गाडी चालवण्याची आवड आहे, हे सांगून मी त्याला कसं तरी, गाडी चालवण्यासाठी तयार केलं. त्यानंतर तो बाजूच्या सीटवर झोपला आणि मी गाडी चालवत मुंबईला पोहोचले. 
- तेजस्विनी दिव्या नाईक 

loading image