heart attack
sakal
- सुनील जगताप
उरुळी कांचन - पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने चारचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर याच कारमधील दोन महिला जखमी झाल्या आहेत. हा अपघात बुधवारी (ता. १४) सकाळी हरणा कॉम्प्लेक्सच्या समोर घडला. कारचालक प्रमोद प्रकाश महंत (वय-३०, रा. जेउर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.