Drone Ban : संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या काळात (२० ते २३ जून) पुण्यात ड्रोन वापरास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आली असून, फक्त अधिकृत परवानगीधारकांना अपवाद ठेवण्यात आला आहे.
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात २० ते २३ जून या कालावधीत ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरावर बंदी घातली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.