जिल्हा बँक निवडणूक

जिल्हा बँक निवडणूक
Published on: 

जिल्हा बँकेच्या निवडणुकीला ब्रेक

दुष्काळी परिस्थितीमुळे स्थगिती; इच्छुकांना प्रतीक्षा

ॲग्रोवन वृत्तसेवा
अमरावती : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित केल्या आहेत. त्यामुळे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. निवडणुकीची अंतिम मतदारयादी जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या तोंडावर स्थगिती मिळाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने सहकार विभागाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली होती. अंतिम मतदारयादी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचा प्रस्ताव सहकार प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला होता. त्यामुळे एक-दोन दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र अपर निबंधकांचे स्थगितीबाबतचे पत्र जारी झाल्याने निवडणूक प्रक्रिया थांबली आहे. परिणामी, बँकेवरील प्रशासकराज कायम राहणार आहे.
दरम्यान, बँकेच्या निवडणुकीसाठी दोन पॅनेलमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता होती. काही आमदारांनीही दुष्काळी परिस्थितीचा दाखला देत मुख्यमंत्र्यांकडे निवडणूक स्थगित करण्याची मागणी केली होती. आता निवडणूक लांबणीवर पडल्याने इच्छुकांना प्रतीक्षा करावी लागणार असून, राजकीय हालचालींसाठी प्रस्थापितांना अधिक वेळ मिळणार आहे.
कोट ---
दुष्काळी परिस्थितीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील शासनाचे पत्र प्राप्त झाले असून, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
- गौतम वर्धन, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com